Breaking News

भाषण पुस्तिका न छापल्यास सपत्नीक उपोषण करू - सबनीस

पुणे, 22 - श्रीपाल सबनीस यांनी  89 व्या अखिल भारतीय साहित्य महामंडळावर नाराजी व्यक्त करत मंडळाविरोधात एल्गार पुकारला आहे. साहित्य संमेलनातील अध्य
क्षीय भाषणाची पुस्तिका न छापल्यास येत्या 27 जानेवारीपासून सपत्नीक आपण उपोषण करू, असा इशारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिला आहे.
पिंपरीमध्ये नुकत्याच झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी श्रीपाल सबनीस यांनी लिहून तयार केलेले भाषण न छापण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयावर सबनीसांनी टीका केली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे भाषण छापले जात नाही. ते रसिकांपर्यंत पोहोचवले जात नाही. हा एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान आहे. अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी 
महामंडळाच्या पदाधिका-यांना दिली कोणी? महामंडळ सेन्सॉर बोर्डासारखे कधीपासून वागायला लागले, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.