एमजीएमतर्फे पत्रकारीता प्रबोधन पुरस्कारांचा आज वितरण समारंभ - लोकमंथनचे कुमार कडलग यांचा समावेश
नाशिक/प्रतिनिधी। 30 - उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या स्थानिक स्तरावरील बातम्या, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांची यथायोग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एमजीएम टीव्ही न्युज चॅनल या स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दि. 30 जानेवारी रोजी दु. 4 वाजता होणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह, मनपा आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त जगन्नाथन, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी नाशिकमधील 17 पत्रकारांना जिल्हास्तरीय प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती एमजीएम टीव्ही न्युज चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित बागमार व संपादक सतिष रूपवते यांनी दिली.
सदर कार्यक्रम शनिवार दि. 30 रोजी पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर सभागृह, पंचवटी, नाशिक या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी कुमार कडलग (लोकमंथन), श्रीकांत बेणी (सी न्युज), मनोज घोणे (दिव्य मराठी), योगेश गांगुर्डे (पुण्यनगरी), प्रियदर्शन टांकसाळे (गांवकरी), संजय पाठक (लोकमत), अनिकेत साठे (लोकसत्ता), संतोष भारजकर (नवभारत टाईम्स), चंद्रशेखर गोसावी (हमारा महानगर), विक्रांत मते (सकाळ), अल्ताफ खान (एशियन एज), डी.एम.जगताप (भ्रमर) पद्माकर देशपांडे (मुंबई तरूण भारत) सुधाकर शिंदे (देशदूत), ज्ञानेस्वर वाघ (पुढारी), मधुकर मंडलीक (नवा काळ), संतोष कमोद (वेध न्युज) किशोर बेलसरे (न्युज 9), प्रशांत अहिरे (नाशिक सर्व्ङिसेस डॉट कॉम) या पत्रकारितेतील धुरीणांना मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.