Breaking News

योगा करा आणि जास्तीचे गुण मिळवा - विनोद तावडे


 मुंबई/प्रतिनिधी । 23 - विद्यार्थ्यांनी मानसिक व शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त रहावे, व योगाभ्यासाला चालना मिळावी यासाठी दररोज योगासने करणार्‍या विद्यार्थ्यांना जादा गुण दिले जातीलफ अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली आहे. 
विद्यार्थ्यांनी शारिरीक व मानसिकदृष्टया कणखर होवून सर्व क्षेत्रात योगदान देण्यासाठी सक्षम होण्यासाठी योगा करा व जास्तीचे गुण मिळवा अशी आॅफरच तावडे यांनी विद्यार्थ्यांना एकप्रकारे दिली आहे.  विद्यार्थ्यांनी योगाचा फायदा करून घ्यावा. विविध क्रीडा प्रकारात भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर रोज योगासने करणार्‍या विद्यार्थ्यांनाही जादा गुण दिले जातीलफ असे ट्विट तावडे यांनी केले. मात्र यापूर्वी क्रीडा कोट्यातून अनेक विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण दिले जातात, मात्र जास्तीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांनी काही वेळा बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता 

योगा करा आणि जास्तीचे गुण मिळवा यात पारदर्शकपणा हवा, असल्याचे शिक्षकवर्गात बोलले जात आहे. दरम्यान मयोगा कॅम्पफ संदर्भात सर्व शाळांना 

सर्क्युलरही पाठवण्यात आले आहे, मात्र त्यास उपस्थित राहण्याचे बंधन कोणत्याही विद्यार्थ्यांवर लादण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले 

आहे. असे असले तरी सर्व शाळांनी योगा करा आणि जास्तीचे गुण मिळवा याचा भरपूपर फायदा करून घ्यावा, असेही शिक्षण विभागातर्फे सुचवण्यात 

आले आहे.