Breaking News

भाववाढीने कापूस उत्पादकांमध्ये समाधान


 जळगाव/प्रतिनिधी। 6 - अत्यल्प पावसामुळे यंदा कापसासह सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा निम्म्याने कापसाचे उत्पन्न हाती आले आहे. त्यात सुरवातीला 4 हजार रुपयांपेक्षाही कमी भाव मिळाल्याने शेतकर्‍यांची घोर निराशा झाली. मात्र, देशासह जागतिक पातळीवर कापसाचे उत्पन्न घटल्याने भावात प्रतिक्विंटल 4 हजार 900 रुपयापर्यंत तेजी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.
शेती मशागतीपासून ते लागवड उत्पादकापर्यंत मोठा खर्च करावा लागतो. यासाठी दरवर्षी बँक व हातऊसनवारीने कर्ज घ्यावे लागते. त्याची तत्काळ परतफेड करता यावी यासाठी शेतकरी कापूस घरात येताच विक्री करतात. 
सुरवातीला 3700 ते 4100 रुपये या भावाने निम्म्याहून अधिक शेतकर्‍यांनी कापसाची विक्री केली. त्यामुळे शेतकर्‍यांचे कँबरडे मोडले आहे. एक तर यंदा कापसाला उतारा नाही त्यात हमी भाव नाही. यामुळे अशा शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 
काही शेतकरी मकर संक्रांतीशिवाय कापूस विक्री करीत नाही. दरवर्षी अशा शेतकर्‍यांना कापसाच्या चढ-उतारामुळे फायदा व तोटा सहन करावा लागतो. मात्र, यंदा अशा शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.  कापसाच्या सरासरी खर्चाच्या तुलनेचा विचार केला तरी सध्या मिळणार्‍या 4600 ते 4900 रुपये प्रतिक्विंटल दरात काही शेतकर्‍यांचा उत्पन्न खर्च निघत नाही, असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.
उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला किमान  हजार रुपये भाव मिळाला तर शेतकर्‍याचा हाती दोन पैसे लागतील. यंदा कोरडवाहू शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. बागायती शेतकर्‍यांचे उत्पन्नही निम्म्याने घटले आहे. सध्या 4 हजार 700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
- नितीन पाटील, शेतकरी