Breaking News

शहर राकाँतर्फे अनधिकृत बॅनर लावू नये-आ. जाधव


 नाशिक /प्रतिनिधी। 6 - नाशिक महानगरपालिका क्षेत्रात वेळोवेळी विनापरवानगी अनधिकृत होल्डिंग, बॅनर, फलक इ. लावण्यात येत असतात. त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रि्पकरण होत असल्याने त्याविरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर जनहित याचिकेची सुनावणी होऊन मा.उच्च न्यायालयाचे दि.26 नोव्हेंबर रोजी आदेश पारित केला होता कि, दि.26 जानेवारी पर्यंत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, पदाधिकारी यांनी त्याचे अनधिकृत होल्डिंग व बॅनर तत्काळ काढून टाकावेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यास होल्डिंग व बॅनर लावावयाचे असल्यास नाशिक महानगरपालिकाचे शुल्क भरून रीतसर परवानगी घ्यावी विनापरवानगिने उभारलेले अनधिकृत होल्डिंग, बॅनर, फलक इ. तातडीने हटवण्यात यावेत अन्यथा संबधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच यापुढे आपल्या पक्षाद्वारे एकही अनधिकृत होल्डिंग, बॅनर, फलक लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सुचना पक्षातील पदाधिकार्‍यांना करण्यात आलेली आहे.  नाशिक महानगरपालिकेकडून संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यावर कार्यवाही झाल्यास त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार राहणार नाही. असे आव्हान आ.जयवंतराव जाधव यांनी केले आहे. नाशिक शहर विद्रि्पकरण होणार नाही यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत प्रयत्नशील राहील.