Breaking News

पठाणकोट हल्ल्याला तोडीस तोड उत्तर केव्हा? सामनाचा सवाल
मुंबई, 5 - पठाणकोटच्या हल्ल्याचे पडसाद ‘सामना’च्या अग्रलेखातही उमटल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आजही बंदुका आणि  तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही आपण पठाणकोट हल्ल्याचा बदला घेणार नसू तर राजपथावर शस्त्रांचं प्रदर्शन दाखवण्यात अर्थ नाही’ अशा शब्दांत मोदी सरकारवर शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे.
शरीफ यांच्यासोबत चहापान घेणारे आमचे पंतप्रधान शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाना काय उत्तर देणार आहेत? असा थेट सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.‘फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे. हवाई दलाच्या पंजाबमधील पठाणकोट येथील तळावर मूठभर दहशतवादी जोरदार हल्ला करतात आणि 72 तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा आहे’ असा जोरदार हल्ला शिवसेनेने चढवला आहे. ‘पंतप्रधान मोदी हे आठ दिवसांपूर्वीच स्वत:च लाहोरला जाऊन पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाहुणचार घेऊन आले. त्यावेळीच सामनातून इशारा दिला होता, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. धोका होईल. पहा, भयंकर धोका झाला! मोदी यांची पाठ वळताच जैश-ए-मोहंमदच्या म्होरक्यांनी हिंदुस्थानच्या हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांचा पाकिस्तानने म्हणे निषेध 
केला.