Breaking News

शारीरिक शिक्षणाच्या तासिका इतर विषयांना न देण्याची मागणी


अहमदनगर प्रतिनिधी

शारीरिक शिक्षण हा महत्वाचा विषय असून, या विषयाच्या अभ्यासातून विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक व बौद्धीक क्षमता विकसित होत असल्याने शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका इतर विषयास देऊ नये या मागणीसाठी उपशिक्षणाधिकारी रामदास खेडकर यांची जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव शिरीष टेकाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

विद्या प्राधिकरण, पुणे यांचे तासिका वाढ झालेबाबतचे दि. ५ ऑक्टोबर २०१७ चे पत्र व शिक्षण उपसंचालक, पुणे यांचे ३१ मे २०१८ च्या पत्रान्वये शिक्षणाधिकार्‍यांना इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका शारीरिक शिक्षण शिक्षकासच देण्यात याव्यात, संच मान्यतेत त्यांना अतिरीक्त ठरवू नये, शारीरिक शिक्षकाच्या शारीरिक शिक्षकच जागी शिक्षकच भरावा. याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत. परंतू, जिल्ह्यात अद्यापही माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापकांना लेखी आदेश देण्यात न आल्याने पूर्वीच्याच पद्धतीने अनेकांनी वेळापत्रक बसविले आहे. यामुळे शारीरिक शिक्षक विषयाच्या तासिका इतर विषयास दिल्याने शारीरिक शिक्षण शिक्षकांवर होत असलेल्या अन्याया संदर्भात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.