Breaking News

दंडकारण्य अभियानास प्रारंभ : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही एक मोठी लोकचळवळ झाली आहे. यावर्षी १ ते ३१ जुलै या काळात बिजारोपण, वृक्षारोपण, पर्यावरण जाणीव आणि जागृती यासह विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या अभियानाचे मार्गदर्शक, माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, सभापती निशा कोकणे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, प्रा. बाबा खरात, केशवराव मुर्तडक, अ‍ॅड. मधुकरराव गुंजाळ, सिताराम राऊत, राजेंद्र कडलग, साहेबराव गडाख, जगन आव्हाड, डॉ. राजेंद्र मालपाणी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

नियोज बैठकीला कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, समन्वयक बाळासाहेब उंबरकर, केशवराव जाधव, प्रा. व्ही. बी. धुमाळ, लक्ष्मण वाघ, अनिल थोरात, सतिष गुंजाळ, किरण कानवडे, डॉ. आर. के. दातीर, नामदेव कहांडळ, बाळासाहेब फापाळे आदींसह अमृत उद्योग समुहातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी दंडकारण्य अभियानाचे प्रकल्प प्रमुख, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाळासाहेब उंबरकर यांनी केले. बाबा ओहोळ यांनी आभार मानले.