Breaking News

दूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार?


नागपूर : महाराष्ट्रात पेटलेला दूधाचा प्रश्न आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होणार असून त्यात दूधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर जाणार होते मात्र तो दौरा रद्द करून शरद पवार दिल्लीत जाणार असून सायंकाळी गडकरी-पवार भेट होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून महाराष्ट्रात दूधाच्या प्रश्नावर आंदोलन पेटलं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईचं दूध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या तीन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा मुंबईत असून हे आंदोलन काही दिवस चिघळलं तर मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होणार आहे. रविवारी पंढरीच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरुवात केली होती. दुधाला लीटर मागे 5 रुपये भाव ही आमची मागणी आहे. 3 रुपये दरवाढ हा निर्णय दूध पावडर तयार करणाऱ्यांनी केलाय. फक्त दूध संकलन करणाऱ्यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्न नाही असंही ते म्हणाले.