वृक्षांचे पालकत्व स्विकारावे ः पिपाडा
राहाता / प्रतिनिधी
वृक्ष लावण्याबरोबरच त्यांचे संगोपण करण्यासाठी सर्वांनी त्याचे पालकत्व स्वीकारले पाहिजे, असे आवाहन राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी नगरपालिकेने आयोजित केलेल्या वृक्षदिंडीच्या समारोपाच्या वेळी केले.
राहाता नगरापालिकेने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवाहन केल्याप्रमाणे, जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी, यासाठी शहरामध्ये जनजागृती व्हावी यासाठी, वृक्षदिंडीचे आयोजन केले. यावेळी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी या वृक्षदिंडीचा शुभारंभ केला यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, मुख्याधिकारी गावीत, धनंजय गाडेकर, डॉ. मंगलाताई गाडेकर, निवृत्ती गाडेकर, मनसेचे विजय मोगले, राजेंद्र गाडेकर, आरपीआयचे दिलीप वाघमारे, इकबाल शेख, हरी गाडेकर, संजय हेकरे, गोरख पवार आदी उपस्थित होते.
राहाता शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी या वृक्षदिंडीत आपला सहभाग नोंदवून प्रत्येकाच्या हातात एक वृक्ष देवून जयघोष करुन नागरीकांना वृक्षाचे महत्व समजविणारे फलक यावेळी या फेरीमध्ये फिरविण्यात आले.