शेतीचे आवर्तन तात्काळ बंद करण्याची मागणी
अकोले / प्रतिनिधी
ऐन पावसाळ्यात भंडारदरा धरणातून सुरू असलेले शेतीचे आवर्तन जलसंपदा विभागाने तात्काळ बंद करण्याची मागणी अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे यांनी केली आहे.
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आत्ता भंडारदरा धरणातून सिंचनाच्या आवर्तनाची काही आवश्यकता नाही. गतवर्षी धरण पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरून गेल्यानंतर, बरेचशे पाणी लाभक्षेत्रात वाहून गेले. त्यामुळे यंदा भंडारदरा निळवंडे या धरणांत मूबलक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र दहा दिवसांपासून भंडारदरा निळवंडे धरणातून लाभक्षेत्रातील शेतकर्यांसाठी सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन सुरू करून जलसंपदा विभाग एक प्रकारे पाण्याची नासाडीच करीत आहे. जर हे पाणी धरणात शिल्लक राहिले तर, धरणे लवकर भरतील आणि ओव्हरफ्लोचे पाणी अधिक प्रमाणात लाभक्षेत्राला मिळेल. मात्र जलसंपदा विभाग जाणून-बुजून या पाण्याची नासाडी करीत असल्याचा आरोप दिलीप भांगरे यांनी केला आहे.आता सर्वत्र पाऊस पडता झाला आहे, त्यामुळे सिंचनाच्या आवर्तनाची गरज काय? असा सवालही दिलीप भांगरे यांनी उपस्थित केला आहे.