Breaking News

दांगट यांच्यावरिल हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी : शिवबा संघटनेची मागणी


सुपा / प्रतिनिधी 
गजेंद्र दांगट यांचेवरिल हल्यातील आरोपीवर कठोर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गाडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवबा संघटनेचे प्रमुख अनिल शेटे, प्रितेश पानमंद, स्वप्निल लामखडे, निलेश लामखडे, शांताराम लामखडे, निलेश वरखडे, पोपट वरखडे, भाऊसाहेब रोकडे, शांताराम पाडळे, पप्पु गवळी, निलेश नससाळे, भाऊसाहेब बेलोटे, गोविंद पवार, सागर अलभर व शिवबा संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2018 रोजी नगर येथिल श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अत्यंत खालच्या स्तरावर जावून उपशब्द वापरले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र निषेध नोंदविला गेला. त्यावेळी छिंदमला नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले, परंतु राजकीय ताकद वापरून त्याने पुन्हा नगर जिल्ह्यात प्रवेश मिळविला. याचा तीव्र निषेध म्हणून नगरसह महाराष्ट्राने केला. यावेळी नगरमध्ये या निर्णयाचा निषेध करण्यासाठी निषेध मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या नियोजनात अ‍ॅड. गजेंद्र दांगड यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याचाच काही समाजकंटकांनी राग घेवून त्यांच्यावर खूनी हल्ला केला. याचा शिवभक्त निषेध करतो, तसेच जे मारेकरी असतील, त्यांना कठोर शासन करण्यात यावे.