स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लूट करणारी हायप्रोफाइल टोळी जेरबंद
संपुर्ण महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक, ठाणे, मुंबई परिसरात स्वस्तात सोने देतो असे अमिष दाखवून लुटमार करणार्या टोळीसह म्होरक्यास अटक करण्यात आली. यातील टोळीचा म्होरक्या त्याचे साथीदार यांना मजूर असल्याचे भासवून त्यांचेकडे खरे असलेले सोन्याचे नाणे देवून ठराविक लोकांना हेरून हे नाणे आम्हाला खोदकाम करीत असताना भेटली आहेत आणि ती विकायची आहेत असे सांगून काही खरी नाणे दाखवून नंतर खोटी नाणे देवून त्यांची लाखो रूपयांची फसवणूक करून लूट करीत असणार्या टोळीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याबाबत शिर्डी पो.स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं 130/18 भादवि कलम 392, 420, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पो. अधिक्षकांनी सूचना देवून तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार, यांना त्यांचे पथकातील सपोनि. कैलास देशमाने, पोसई श्रीधर गुठ्ठे, पोसई सुधीर पाटील, पोसई राजकुमार हिंगोले, पोहेकॉ. योगेश गोसावी, पोहेकॉ. योगेश गोसावी, पोहेकॉ. दत्ता हिंगडे, पोहेकॉ. उमेश खेडकर, पो.ना. मल्लिकार्जुन बनकर, पो.ना. दिगंबर कारखेले, पो.ना. रावसाहेब हुसळे, पो.ना. भागीनाथ पंचमुख, पो.ना. रविकिरण सोनटक्के, पो.कॉ. योगेश सातपुते, पो.ना. रविंद्र कर्डीले, पो.ना. दत्ता गव्हाणे, पो.ना. मनोज गोसावी, पो.ना. दिपक शिंदे, पो.ना. विजय ठोंबरे, पो.कॉ. मेघराज कोल्हे, चापोहेकॉ. बाळासाहेब भोपळे, चापोहेकॉ. संभाजी कोतकर यांना तपास करत असताना पो.नि. दिलीप पवार यांना गोपनिय माहिती मिळाली कीख अशा प्रकारचे गुन्हे करणारे काही इसम पुणे जिल्ह्यातील कार्ला फाटा परिसरात येणार आहेत. माहिती समजताच पथकाने सदर आरोपीकडे बनावट गिर्हाईक पाठवून सिनेस्टाईलने जूना पुणे मुंबई हायवेवर पाठलाग करून टोळीस ताब्यात घेतले असता, त्यांचेकडे अलिशान कार ऑडी, फॉर्च्यूनरमधील संशयीत इसमांना ताब्यात घेतले त्यामध्ये भिमाभाई गुलशनभाई सोलंकी, (वय 41) मुळ रा. बडोदा गुजरात हल्ली रा. देवगाव, तळेगाव जि. पुणे, हारूण सय्यद अहमद शेख (वय 43), गणेश हिरा काशिद रा. काशीनगर नागपुर हल्ली रा. पुणे, संतोष शिवराम गोपाळे, (वय 42) रा. आकुर्डी जि. पुणे हे तळेगाव दाभाडे असे असल्याचे सोगितले, त्याचबरोबर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. या टोळीच्या म्होरक्याकडे पुण्यामध्ये एक फार्म हाऊस, एक अलिशान फ्लॅट, एक राहते घर, अलिशान ऑडी, कार क्र. एमएच 14 एफएस 2526, एक फॉर्च्युनर गाडी क्र. एमएच 14 ईपी. 4, एक डस्टर कार, अशी चारचाकी वाहने आहेत. तसेच त्याने पुणे, मुंंबई, ठाणे परिसरातील साथीदार यांचे मदतीने अनेक गुन्हे केले आहेत. सदर आरोपींनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केलेले असून त्यांचेकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांची अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पो. स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, श्रीरामपुरचे अपर पो.अधिक्षक रोहिदास पवारख कोपरगाव विभागाचे उपविभागीय पो. अधिकारी सागर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.