समृध्दी महामार्ग मोबदल्यासंदर्भात सभापतींची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे
सभापती अनुसया होन यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून समृध्दी महामार्गासाठी चांदेकसारे परिसरातील संपादित जमिनीच्या मोबदल्याबाबत लोकप्रतिनिधींच्या नावाने खडे फोडणे म्हणजे त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशीच झाली आहे. स्वतः आधी रस्त्याच्या कामाला विरोध करायचा आणि त्यानंतर शेतकयांना वार्यावर सोडून देवून आपल्यामुळेच जादा मोबदला मिळाल्याच्या वल्गना वृत्तपत्रातून करावयाच्या याबाबत त्यांनी आत्मपरिक्षण करावे मगच बोलावे असे पत्रक चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम खरात व उपसरपंच अशोक हरिभाऊ होन यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, चांदेकसारे ग्रामपंचायत निवडणुकींत मतदारांनी ज्यांना घरचा रस्ता दाखविला त्यांना आमच्यावर टिका करण्यांचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, राज्यात शासनच मुळात भाजपा शिवसेना युतीचे आहे, त्यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत, ते चुकीचे व जनतेची खोटी दिशाभूल करणारे आहेत. नागपूर मुंबईसमृध्दी महामार्ग कोपरगाव तालुक्याच्या अकरा गावांमधून जात असून, जोपर्यंत शेतकर्यांचे समाधान होणार नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याच पाठीशी आहोत, अशी भूमिका आ. स्नेहलता कोल्हे यांनी घेतली, बोलल्याप्रमाणे त्यांनी करूनही दाखवलं. समृध्दीचा हा काही मोबादला मिळत आहे. तो न्यायालयाच्या नव्हे तर त्यांच्याच भूमिकेमुळे, या सर्व शेतकर्यांची शिफारस त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे व रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाकडे केली. असे असतानाही विरोधक केवळ टिका करीत आहेत. स्पर्धा ही विकासाची व्हावी , सभापती अनुसया होन या चांदेकसारेच्या आहेत त्यांनी अन्य गावांचा विचार करण्यांबरोबरच आपल्या गावाला झुकते माप देवून त्यांना जो काही विकास करावयाचा आहे, तो त्यांनी करून दाखवावा. शेवटी त्यांच्यासाठी निधी हा आमच्याच भाजपा शिवसेना शासनाचा येणार आहे, असेही पुनम खरात व अशोक होन यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.