जनावरांचे डॉक्टर नसल्याने मुक्या प्राण्यांचे हाल जि. प. पशुसंवर्धन अधिकार्यांकडे तक्रार
जामखेड येथे बाजर समितीच्या आवारत एक गाय जखमी अवस्थेत पडल्याची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी धाव घेतली. तिचे प्राण वाचवले सोमवारी मध्यरात्री मार्केट यार्ड येथील सुभाष भंडारी यांच्या दुकानासमोर मोठी गाय पाय मोडलेल्या व अंगावर अनेक ठिकाणी जखमा झालेली सुभाष भंडारी यांनी पहिली. सदर माहिती त्यांनी कांतीलाल कोठारी यांना दिली. त्यांनी व पांडुरंग भोसले यांनी डॉ. विजय पवार (पंचायत समिती) मार्फत पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलावले. सदर गाईच्या पायाचे 3 ठिकाणी हाड मोडले होते. त्यातून रक्तस्त्राव होत होता. सर्व जखम स्वच्छ करून, डॉ. पवार यांनी तीला नगर येथे नेण्यास सांगितले, जामखेड पशुधन विकास अधिकारी डॉक्टर फून्ने यांची बदली झाल्यामुळे 18 जूनपासून दवाखान्यात एकही डॉक्टर नाही. त्यामुळे मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. जामखेडमधील नान्नज व खर्डा येथे तर मागील दीड वर्षापासून पशुधन विकास अधिकारी नेमण्यात आले नसल्याने, परिसरातील शेतकरी आपल्या जनावरांच्या वेदना पाहून दुःखी होत आहेत. बरेच पशु आपला जीव गमावत आहेत. त्यासाठी ताबडतोब वरिष्ठ अधिकार्यांनी जामखेड नान्नज आणि खर्डा येथे पशुधन विकास अधिकारी यांना नेमण्यात यावे, असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी यावेळी सांगितले. जखमी झालेल्या गाईस अहमदनगर येथे डॉक्टर बोठे यांच्याकडे पाठवली. जामखेडला डॉक्टरांची सोय नसल्याने, नगरला नेण्याचा खर्च सोसावा लागत आहे.
यावेळी गणपत डोके, पांडुरंग भोसले, कांतीलाल कोठारी, सुभाष भंडारी, प्रवीण छाजेड, निलेश भंडारी, संजय टेकाळे, गणेश बांदल, सचिन पवार, विशाल पवार, शिवराज विटकर, भाऊ पोटफोडे, बाळू ढाळे, नितीन राऊत, दशरथ बहिर आदींनी मदत केली.