मुख्यमंत्री निधीतून रोहीत डाडर यास 70 हजारांची मदत
तालुक्यातील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या विद्यालयात इयत्ता 9 वीच्या वर्गात असणारा विद्यार्थी मार्च महिन्यात होळीच्या एक दिवस अगोदर चिंचाच्या झाडावरुन पडून जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मदत म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांनी ना. राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करुन मुख्यमंत्री निधीतून 70 हजाराची मदत मिळवून दिली. सदर रक्कमेचा चेक मंगळवारी रोहीत डाडर, त्याचे वडील विनोद डाडर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजु मोरे, बाबासाहेब मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते. सदरची मदत मिळण्यासाठी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी राजु मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विनोद डाडर यांचे कुटुंब गरीब घरातील असल्याने त्यांना मिळालेल्या या आधारामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले.