Breaking News

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म, दोघांवर गुन्हा दाखल


तालुक्यातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस चाकूचा धाक दाखवून पळवून नेत दुष्कर्म केल्याची घटना २९ व ३० जून रोजी घडली. याची दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, मुलींच्या आईने फिर्याद दिली आहे. सातनदुधनी येथील संजय माशाळकर व आकाश खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी घरात एकटीच असताना संजयने चाकूची भीती दाखवून घरातून ओढून बाहेर काढले. त्यानंतर आकाश खंदारेच्या मोटारसायकलवर बसवून दुधनी येथे नेले. तेथे आकाशला सोडून तो मुलीला घेऊन मुलीस उमरगा चौरस्ता जवळील वीट भट्टीवर नेऊन दुष्कर्म करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय लाथा-बुक्क्याने मारहाण करून गावात आणून सोडले. पीडित मुलीचे वडील सालगडी म्हणून दुसरीकडे काम करतात. घरी मुलीची आई, मुलगी व एक लहान भाऊ असे तिघे राहतात. घटनेनंतर मुलगी खूपच घाबरली होती. तिला धीर देऊन विचारल्यावर तिने सर्व हकिकत सांगितली