Breaking News

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांचा काश्मीर दौरा

श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी आज काश्मीरच्या सुरक्षास्थितीची पहाणी केली. राजनाथ सिंह दोन दिवसांच्या क ाश्मीर दौर्‍यावर आहेत. राज्यपाल राजवटीनंतर पहिल्यादांच राजनाथ सिंह काश्मीर दौर्‍यावर आले आहेत. राजनाथ सिंहांनी कश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरांची भेट घेतली. कश्मीरच्या सुरक्षा संबंधीत मुद्यांवर त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली. राज्यपालांना कश्मीरच्या सुव्यवस्थेसाठी मदत करण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी ते म्हणाले, की ’जम्मू काश्मीरच्या सामान्य नागरिकांसाठी विकास आणि सुशासन शिल्लक राहीलेले नव्हते. परंतु आता केंद्र सरकार नागरिकांना या स्थितीतून बाहेर काढणार आहे. तसेच जम्मू कश्मीरात शांतता, सुव्यवस्था आणि स्थिरता लवकरच स्थापित केली जाईल.