‘पुनर्जन्म’ साजरा करण्यासाठी मंत्र्याची पूजा
अलाहाबाद : साधारणपणे लोक आपला वाढदिवस साजरा करतात. मात्र उत्तर प्रदेशचे एक मंत्री एका हल्ल्यातून बचावलेला दिवस ‘पुनर्जन्म’ म्हणून साजरा करतात. यासाठी विशेष पूजेचे आयोजन केले जाते. उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांची सत्ता असताना नंद गोपाल यांच्यावर रिमोट बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते बचावले होते. तेंव्हापासून स्वताच्या सुरक्षेसाठी पूजा करतात. अलाहाबाद शहरात झालेल्या या पुजेमध्ये राज्याचे अधिकारी आणि काही मंत्र्यांची उपस्थिती होती. शहरात नंद गोपाल यांचा ‘पुनर्जन्म’ दिवस साजरा करत असताना अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती.
