प्रा. अशोक कानडे यांना पीएचडी प्रदान
कोल्हार प्रतिनिधी
राहता तालुक्यातील रुई येथील रहिवासी व पद्मश्री विखे महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. अशोक कानडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. कानडे यांनी ‘पेरूची फळे शेतकऱ्याने तोडल्यानंतर त्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करून विक्रीसाठी नियोजन करता यावे, याकरीता लोणी येथील पी. व्ही. पी. कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागातील प्रा. कानडे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ व ‘ऑटोमॅटिक मशीन व्हिजन बेस्ड फ्रुट सॉर्टर’ अशी दोन यंत्र तयार केलेली आहेत. या यंत्रांची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आलेली आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागप्रमुख तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी प्रा. कानडे यांना या संशोधनासाठी मार्गदर्शन केले. या कामगिरीबद्दल प्रा. कानडे यांचे रुई ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.