महाराष्ट्र शासन वन विभाग आयोजित वन महोत्सव ह्या उपक्रमात ह्या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवड साठी सुरुवात झाली. आपला कट्टा संस्था ह्या उपक्रमात सहभाग घेऊन हातभार लावत आहे. ह्या वर्षी देखील भिवंडी येथील कासणे ह्या गावात सुमारे ३ हेक्टर क्षेत्रात वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. वनविभाग अधिकारी दिलीप सुतार, सिनेकलावंत रमेश वाणी, डॉ. अरुण औटी ह्यांच्या हस्ते ह्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. ह्या प्रसंगी आपला कट्टा संस्थे चे सर्व पदाधिकारी व सुमारे ४५ हरितसेवक उपस्थित होते. एका रोपाची विधिवत पूजा करून त्याचे रोपण करुन ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह्या वाढत्या शहरीकरणामुळे सतत होणारी वृक्षतोड ह्याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि वनसंपदा वाढीस लागावी ह्यासाठी महाराष्ट्र शासन हा उपक्रम दरवर्षी राबवत आहे. डोंगर माथ्यावरील वनक्षेत्रे झाडे नसल्यामुळे तेथील जमिनीची झीज व भुस्कलन होत आहे, हा होणारा ऱ्यास थांबवण्यासाठी वनक्षेत्रात अधिक वृक्षलागवड करण्याची गरज आहे. आपला कट्टा संस्था सातत्याने गेली ३ वर्ष भिवंडी येथील वनक्षेत्रात वृक्षलगवाडीसाठी खारीचा वाटा उचलत ह्या उपक्रमात सहभाग घेत आहे. ह्यावर्षी देखील आपला कट्टा संस्थेने सक्रिय सहभाग घेऊन कासणे वनक्षेत्रात १११२ नवीन वृक्षांची लागवड केली. ह्या प्रसंगी आपला कट्टा संस्थेचे सर्व पदाधिकारी व ४५ हरितसेवकांचा सहभाग होता.