केंद्रीय बांधकाम विभागाच्या महाराष्ट्रातील 3 स्थळांना पुरस्कार
नवी दिल्ली : केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाराष्ट्रातील 3 स्थळांना ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि सर्वोत्तम प्रकल्पां’ साठी आज प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील 2 स्थळांचा आणि पुण्यातील एका स्थळाचा समावेश आहे.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय नगरविकास व गृह निर्माण मंत्रालयाच्या वतीने आज‘सार्वजनिक बांधकाम विभागा’ च्या 164 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फोंस, केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री विजय गोयल, सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा यांचासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या इमारती, तसेच त्यांच्या देखभालींसाठी विविध पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील 3 स्थळांचा समावेश यामध्ये आहे.