Breaking News

‘स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018’ ची घोषणा; महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये होणार सर्वेक्षण




नवी दिल्ली 
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आज “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्यांना तसेच जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीदिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत “स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018” ची घोषणा विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे संयुक्त सचिव अरूण बरोका आणि स्वच्छता पेयजल विभागाचे महासंचालक अक्षय राऊत उपस्थित होते.