Breaking News

आशियाई खेळांसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा,लिएँडर पेस 'इन'; युकी भांबरी 'आउट'

मुंबई प्रतिनिधी

१८ ऑगस्टपासून इंडोनेशियात आशियाई खेळांना सुरुवात होणार आहे. या खेळांकरिता आज अखिल भारतीय टेनिस संघटनेने १२ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेसचं आशियाई खेळांसाठी भारतीय संघात पुनरागमन तर भारताचा सध्याचा आघाडीचा टेनिसपटू युकी भांबरीला वगळण्यात आलेलं आहे.

जागतिक क्रमवारीत ९४ व्या क्रमांकावर असलेला युकी भांबरी यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत खेळणार आहे. २७ ऑगस्टपासून अमेरिकन ओपन स्पर्धेला सुरुवात होणार असून, आशियाई खेळांमध्ये टेनिसचे सामने १९-२५ ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासासाठी मिळणारा कमी वेळ पाहता युकी भांबरीला भारतीय संघात जागा मिळालेली नाहीये.