मा. आ. डॉ. नरेंद्र घुले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
भेडा-(प्रतिनिधी )
नेवासा तालुक्याचे भाग्यविधाते मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील यांच्या 58 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेंडा येथील मानवता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मा.आ. पांडुरंग अभंग बोलत होते. यावेळी अहमदनगर येथील जनकल्याण पेढीने 60 लोकांच्या रक्तदानातून 60 बाटल्या रक्त संकलन केले. याकामी डॉक्टर विलास मढिकर यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी नेवासे तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे काशिनाथ नवले, अॅड. देसाई आबा देशमुख, पंचायत समिती मा. सभापती तुकाराम मिसाळ, जनरल मँनेजर काकासाहेब शिंदे, एम. डी. आनिल शेवाळे, जिजामाता पब्लिक स्कुलचे प्राचार्य दिनकरराव टेकने, प्राचार्य बि. जे. अप्पाराव, सुरक्षा आधिकारी सुनील देशमुख, लेबर अॅाफिसर बाळासाहेब डोहाळे, पोपटराव ऊगले, पत्रकार आशोक वाघ, गणेश मुळे, संदीप जावळे, आण्णासाहेब नजन, गणेश गव्हाने, यशवंत पाऊलबुद्धे, जलमीत्र सुखदेव फुलारी, अशोकदादा मिसाळ, संभाजी माळवदे आदि उपस्थित होते.
पांडुरंग अभंग पुढे म्हणाले की नरेंद्र घुले पाटील एक संयमी व अभ्यासु व्यक्तिमत्व असून जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्चिनारे, गाव, तालुका, मतदारसंघ नव्हे तर जिल्हाभर त्यांनी आपल्या कार्याने ठसा उमठवला आहे.
