Breaking News

व्यंकेटश पतसंस्था घोटाळा; ठेवीदाराने केला विष घेऊन जिवन संपवण्याचा प्रयत्न


सोनई( प्रतिनिधी )  
श्री व्यंकेटश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 2 कोटी रुपये घोटाळाप्रकरणी कर्मचारी दोषी आढळल्याने अटक आहेत. त्यात अपहार काळात विविध कामकाजात व कायद्याअंतर्गत कार्य व जबाबदार्‍या म्हणून उपविधी क्र.43 (1ते 27) नुसार संचालक मंडळ जबाबदार असल्याचे लेखा परिक्षक एस. एस. सोमाणी यांनी 25 जानेवारी 2018 रोजी च्या आर्थिक अपहारात संचालक मंडळ दोषी आढळलेले आहे.त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी संचालक मंडळ यावर गुन्हा दाखल करावा यासाठी ठेवीदाराणी सहायक निबांधक यांना घेराव घालून जाब विचारला यातूनच शाब्दिक चकमक होण्याआधी एका ठेवीदारांनी संतप्त होऊन रागाच्या भरात सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांच्यासमोरच जीवन संपवण्यासाठी विष घेण्याचे पाऊल उचललण्याची घटना नेवासे इथे घडल्याने पतसंस्था क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान दोषी संचालक मंडळावर कठोर कारवाई करावी व तात्काळ अटक करण्याची मागणी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केली आहे. जर कारवाई केली नाही तर 10 जुलै राजी संबंधित विभागात विष घेऊन आत्महत्या करण्याचाइशारा ठेवीदाराने दिला आहे .
सोनई येथील व्यंकेटश पतसंस्थेने केलेल्या फसवणूक प्रकरणी लेखा परीक्षण अहवालानंतर संस्थेच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होऊन तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे. दिनांक 19 जून रोजी महावीर दरक, सुभाष लुनिया, अभय भळगट्ट, शंकर तेलोर, अशोक हलाल,कादिर शेख यांच्यासह अनेक ठेवीदारांनी आंदोलन केले. नंतर सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले की, कर्मचार्‍यांबरोबर संचालक मंडळाला दोषी ठरवून गुन्हा दाखल करावा व ठेवीदारांचे जो पर्यंत पैसे मिळत नाही, तो पर्यंत संचालक मंडळास जामीन मंजूर करू नये, अशी संतप्त भावना ठेवीदारांनी व्यक्त केली. 
चौकट ः सहाय्यक निबंधक कार्यालयात रोगर
सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांच्याशी चर्चा सुरू असताना गरीबी व संचालक मंडळाच्या जाचाला कंटाळून टेलरिंग व्यवसाय करणारे बाळासाहेब दादा धाडगे यांनी आपली जीवन यात्रा संपवण्यासाठी खिशातून विषारी रोगर औषधाची बाटली काढली पण सोबत असलेल्या ठेवीदार विष्णु वीरकर यांनी हातातून हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला. नुकतेच पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्यात कुकाणा व नगर तालुक्यात आत्महत्या सत्र सुरू झाल्याने अधिकार्‍यांवर रोष वाढला आहे.