माजी नगरसेवक अॅड.धनंजय जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
माजी नगरसेवक अॅड.धनंजय जाधव यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. साई द्वारका सेवा ट्रस्ट, हेल्प मी इंडिया व डॉ.गोरे डेंटल क्लिनिकच्या वतीने मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबीराचा लाभ घेतला.
शिबीराचे उद्घाटन धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.केतन गोरे, सचिन गुलदगड, जालिंदर बोरुडे, चंद्रकांत लिपारे, मनोज नडे, सुनील सुडके, दीपक घाडगे, स्वप्निल लेंडकर, राजेंद्र बोगा, सागर सूरपुरे आदी उपस्थित होते.
धनंजय जाधव म्हणाले की, सर्वसामान्यांच्या सेवेतच ईश्वरसेवा आहे. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण केल्यास मोठे समाधान मिळते. खर्चिक आरोग्य सुविधांचा भार सर्वसामान्यांना पेळवत नाही. यासाठी संस्थेच्या वतीने विविध आरोग्य शिबीराचे आयोजन करुन गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना देखील आर्थिक मदत केली जाते. तर दर वर्षी वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.