Breaking News

विकासकामे करण्यासाठी कटीबद्ध - करण ससाणे


श्रीरामपूर (प्रतिनिधी) 
मुरकुटे गटाचे कट्टर समर्थक उंदिरगाव सोसायटीचे विद्यमान व्हा. चेअरमन चांगदेव आढाव यांनी तालुका काँग्रेसचे नेते, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या उपस्थितीत ससाणे गटात प्रवेश केला . मुरकुटे गटातील प्रमुख मंडळींकडून वारंवार मिळणार्‍या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आढाव यांनी युवा नेतृत्व करण ससाणे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई अशोक पवार यांच्या निधीतील चार हायमॅक्सचे व शिवाजी मळा नाईक पडोळे वस्ती येथील ओढ्यावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांच्या निधीतील सुमारे 10 लक्ष रुपये खर्चाच्या पुलाचे लोकार्पण युवा नेते करण ससाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आढाव यांचा सत्कार युवा नेते करण ससाणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदरप्रसंगी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, जिल्हा परिषद सदस्या मंगलताई अशोक पवार, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, अशोक पवार, प्रगतचे चेअरमन शिवाजी भालदंड, बाळासाहेब पडुळे, मच्छिंद्र आढाव, दिलीपराव भालदंड, हरिभाऊ बांद्रे, अमोल नाईक, दिलीप गलांडे, कचरु भालदंड, दत्तात्रय गुळवे, बाळासाहेब निपुंगे, प्रकाश ताके, शिवाजी आढाव, बापूसाहेब घोडे आदि उपस्थित होते.