Breaking News

कृषी क्षेत्रात महिलांची भुमिका निर्णायक - घावटे


पानेगाव ( प्रतिनिधी )
कृषी क्षेत्रात करिअर बरोबरच नविन तंत्रज्ञानाच्या युगात महिलांची भुमिका निर्णायक असल्याचे मत अंमळनेर( ता.नेवासे) येथील लोकनियुक्त सरपंच भारती अच्युतराव घावटे यांनी कृषी महाविद्यालयात सोनईच्या कृषी कन्यांचे स्वागत कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी कृषीकन्या मध्ये अंजली काळे, अपेक्षा पोखरकर, निकीता बेल्हेकर, चिंगू ओहळ, सोनाली माळी, भाग्यश्री शेट्टी, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मोटे, अच्युत घावटे, रामभाऊ पवार आदी उपस्थित होते.