Breaking News

अमोल बंदरे सेट परीक्षा उतीर्ण


कोपरगाव ता. प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्गुरू गंगागिर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या इतिहास विभागातील अमोल अशोक बंदरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. झरेकर आर. एस. व प्रा. विधाटे जी. एस. यांचे बंदरे यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजीमंत्री शंकरराव कोल्हे, माजी आ. अशोक काळे, बिपीन कोल्हे, आशुतोष काळे, डॉ. गोवर्धन हुसळे, विजय आढाव, संदिप वर्पे, कारभारी आगवण, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. पी. गाढे, उपप्राचार्य नानासाहेब देवकर, उपप्राचार्य संजय शेटे, उपप्राचार्य डॉ. बी. बी. निघोट, उपप्राचार्य डॉ. बी. बी. कांदळकर व सर्व विभागप्रमुख, अधीक्षक सुनिल गोसावी व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.