नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब - डॉ. सुभाष भामरे
नाशिक, दि. 13, जून - संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रामधील उत्पादनातीलल संशोधनाला अधिकाधिक चालना मिळावी, यासाठी कोईमतूरनंतर आता नाशिकमध्येही ’डिफेन्स इनोव्हेशन हब ’ होईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. नाशिकमध्ये ’ डिफेन्स हब ’ची क्षमता असल्यामुळेच येथे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबाबत शुक्रवारी (दि. 15) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती देताना ते बोलत होते.
सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सी. आय. आय. तर्फे शुक्रवारी (दि.15) येथील हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे ’संरक्षण व संरक्षण हवाई उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी संधी ’ या विषयावर एक दिवसीय हे चर्चासत्र होत आहे.
केंद्र शासनतर्फे डीफ एक्स्पो 2018 मध्ये ’इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. या योजनेसाठी ’डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून ’ना नफा ना तोटा’ तत्वावर निधी उपलब्ध करुन दिला जातो. ऑर्गनायझेशनसाठी एच. ए. एल. ने शंभर कोटी आणि बी. ई. एल. ने 50 कोटींचा निधी उभारला आहे. खासगी संस्थांनी संरक्षण भांडारविषयक तयार केलेल्या साहित्याची गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सीज (आऊट सोर्सिंग ऑफ क्वॉलिटी ऍश्युरन्स फंक्शन फॉर डिफेन्स स्टोअर्स मॅन्युफॅक्चरड बाय प्रायव्हेट इंडस्ट्रीज टू थर्ड पार्टी इन्स्पेक्शन एजन्सीज) आणि व्यापार प्राप्ती योग्य सूट प्रणाली (ट्रेड रिसिव्हेएबल्स डिस्कॉन्टिंग सिस्टीम) याचा शुभारंभ नाशिकमध्ये आयोजित चर्चासत्रात होणार आहे,असे सांगून डॉ. भामरे म्हणाले, देशात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देत भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनवण्याची भूमिका केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्विकारली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामधील नाशिकमध्ये ’डिफेन्स हब’ होण्याची क्षमता आहे. त्यामुळेच त्याला पूरक ठरेल, असा उपक्रम पहिल्यांदाच नाशिकमध्ये राबविला जात आहे.
चर्चासत्रात नौदल, लष्कर, हवाईदल विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी, टाटा, महिंद्रा, किर्लोस्कर, भारत फोर्ज या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्ड, संरक्षण संशोधन व विकास प्र तिष्ठान, डायरेक्टर जनरल ऑफ क्वॉलिटी ऍश्युरन्स, एअर क्वॉलिटी ऍश्युरन्स, एच. ए. एल., जी. एस. एल. या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत. निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर, लघु उद्योग भारती आदी संघटना सहभागी होणार आहेत. संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्हेंडरशीप विकासाच्या अनुषंगाने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमातून नाशिक च्या औद्योगिक क्षेत्राला व रोजगारनिर्मितीला यातून चालना मिळेल,असेही त्यांनी सांगितले.
चर्चासत्राची सुरुवात सकाळी 10वाजता होईल. यात सी. आय. आय. चे पश्चिम विभागाचे अध्यक्ष पिरुझ खामबत्ता, संरक्षण मंत्रालयातर्फे सहसचिव संजय जाजू, इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सचे महासंचालक लेफ्टनंट (निवृत्त) जनरल सुब्रता साहा, भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक-अध्यक्ष बाबा कल्याणी, हवाई दलाचे एअर मार्शल एस. बी. देव, लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबू, राज्य शासनाचे लघु व मध्यम उद्योगाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे,नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, किर्लोस्कर पंपचे प्रकल्प प्रमुख सुनील बापट हे संवाद साधतील.