यशस्वी, आनंदी व परिपुर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग अम्मा भगवान दर्शविते
प्रत्येक व्यक्तीची आंतरिक दुनिया कशी आहे. त्यावर बाहेरील दुनिया आधारित आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अशी श्री अम्मा भगवान यांची शिकवण आहे. अम्मा भगवान यांना आपण आपले समजलो तर त्यांचा कृपाशिर्वाद मिळतो. त्यामुळे प्रत्येकाला यशस्वी, आनंदी व परिपूर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग सहज उपलब्ध होतो. भक्तांना अनेक चमत्काराने असा अनुभव प्राप्त झाला आहे, असे अम्मा भगवान यांच्या शिष्या निवेदनाजी यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले.
परमज्योती श्री कल्की विशाल गणपती अद्भूत वरदान श्री अम्मा भगवान यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा कार्यक्रम रविवारी येथील नंदनवन लॉन येथे झाला. त्यावेळी त्या बोलत होतो. आमदार विजय औटी, वसंत लोढा, अशोक कानडे, अशोक बाबर, अभिषेक कळमकर, बीड जिल्हा परिषद उपाध्यक्ष विजय मुंढे, बँक संचालक गुंड पाटील, सुद्रिक यावेळी उपस्थित होते.
निवेदनाजी म्हणाल्या, एका सामान्य स्त्रीला विमानात प्रवास करण्याची इच्छा प्राप्त झाली. तिने तसे तिच्या पतीला सांगितले. परंतु ही इच्छा भरभक्कम आर्थिक ऐपत नसल्याने शक्य नव्हते. तरीही अम्मा भगवान यांच्याकडे हक्क मागितल्याने त्या स्त्रीला लकी ड्रॉच्या माध्यमातून ही संंधी प्राप्त झाली. प्रलंबित थकलेले मोठ्या रकमेचे बिल असेच एका भक्ताला प्राप्त झाले.
सकारात्मक जीवन ज्यांच्याकडे आहे आणि जे आपले कर्तव्य नियमित, प्रामाणिक बजावताना आई-वडिल, सासू-सासरे आदी ज्येष्ठांना मान देतात, त्यांचा स्वाभिमान दुखावत नाही. जे प्रपंच करताना समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने सेवा देतात, देशप्रेम व्यक्त करतात, असे प्रत्येक जण या परिवारात आहेत. त्यांना आपले यश, सुख हे आई-वडिल आदींच्या पुण्याईने प्राप्त आहे. संकट, अडचणी प्रत्येकाला येतात. ते कोणालाच चुकत नाही. परंतु या अडचणींना तोंड देऊन जो पुढे जातो तो यशस्वी होतो, असाही उपदेश त्यांनी केला.
त्या म्हणाल्या, संकट, अडचणी ही संधी आहे . ती पार करणे हाच विकासाचा मोठा मार्ग आहे. तो तुम्हाला प्राप्त होतो. याच प्रशिक्षणच या परिवारात दिले जाते. अडचणी, संकटाला घाबरुन खंत व्यक्त करत बसणे म्हणजे अपयशाला आमंत्रण देतो आहे. आपण मूर्तीच्या दर्शनातून आणि स्वतःच्या मुखातून परमेश्वराचा नामजप करतो तो आपल्यासाठी भगवंताचा अप्रत्यक्ष सहवास प्राप्त होतो. पण नामदेव, तुकाराम , जनाबाई, एकनाथ महाराज यांच्या सारख्या व्यक्तींना तर भगवंताने परिवारातल्या सदस्याप्रमाणे सहवास दिला. गांधीजींच्या मुखी रामनाम होते.
सत्याचा मार्ग त्यांना रामनामातून प्राप्त झाला म्हणून स्वातंत्र्य समरात ते अग्रस्थानी राहून स्वातंत्र्यप्राप्ती करु शकले.
जगाच्या प्रारंभीच्या काळी ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमुर्तीचे रुप भगवान दत्त अवतारात झाले. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती स्वामी, स्वामी समर्थ, साईबाबा आणि अम्मा भगवान हे दत्त अवतारातील असल्याने जगाच्या उद्धारासाठी त्यांचे जीवन होते व आहे. त्यांच्या दर्शनाचे भाग्य आपण प्राप्त करु शकतो, असे सांगून त्यांनी विविध प्रसंग, घटनांच्या माध्यमातून परिवारात असलेल्या भक्तांचे संरक्षण कसे होते याचे दाखले दिले.
Attachments area