Breaking News

दखल नाव श्रीरामसेना, कृत्य रावणाचं

मराठीत एक म्हण आहे नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा. या म्हणीचा अर्थ नाव कितीही चांगलं असलं, तरी त्या व्यक्तीचं वागणं नावाप्रमाणं असतंच असं नाही. बर्‍याचदा ते नावाच्या बरोबर उलटंही असतं. कर्नाटक व उत्तर प्रदेशात श्रीरामसेना कार्यरत आहेत. दोन्ही संघटनांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. श्रीराम हा आदर्श राजा होता. एकवचनी होता. त्यांचं चारित्र्य शुद्ध होतं. त्यांनी समाज एकत्र केला. छोट्या समाजांनाही त्यांनी प्रतिष्ठा दिली. राजा हिंदू असला, तरी कडवं हिंदुत्त्व त्यांनाही मान्य नव्हतं. त्यांचं हिंदुत्त्व अन्य धर्मियांचं स्वातंत्र्य कधीच संकुचित करणारं नव्हतं. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीची विनम्रता होती. 
....................................................................................................................................................
उत्तर प्रदेश व कर्नाटकात असलेल्या सेना मात्र समाज दुभंगण्याचं काम करीत असतात. हिंदुत्त्वाचा त्यांना खरा अर्थ तरी कळला आहे, की नाही, अशी स्थिती आहे. श्रीरामाचं नाव घेऊन स्थापन झालेल्या या सेना आणि त्यांच्या नेत्यांमुळं दंगली होतात. कर्नाटकमधील श्रीराम सेनेच्या प्रमुखांना यापूर्वी वादग्रस्त विधानांमुळं गजाआड व्हावं लागलं होतं. आपल्या नेत्याचं कौतुक करायला हरकत नाही. त्यांची बाजू समर्थपणे मांडण्यासही काही प्रतिवाद नाही; परंतु हे करताना अन्य व्यक्तींना क स्पटासमान लेखायचं काहीच कारण नाही. किमान गेलेल्या व्यक्तीबद्दल तरी अपशब्द वापरू नये, असं हिंदू संस्कृतीच सांगते. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीच गुजरातमधील दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांची गणना कारखाली आलेल्या कुत्र्याशी करीत असतील, तर त्यांचे कडवे समर्थक असलेल्या श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांच्याक डून तरी वेगळी अपेक्षा कशी बाळगता येईल? ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्याविषयी त्यांनी आता वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुथालिक यांनी लंकेश यांची कुत्र्यासोबत तुलना केली आहे. बेंगळुरू येथे श्रीराम सेनेच्या एका रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येशी श्रीराम सेनेचा काहीही संबंध नाही. हिंदू संघटनांनी गौरी लंकेश यांची हत्या केली अशी चर्चा आहे; पण गौरी लंकेश यांच्यासोबतच महाराष्ट्रातील दोन हत्या व कर्नाटकातील दोन हत्या या काँग्रेसचे सरकार असताना झाल्या आहेत. काँग्रेस सरकारच्या या अपयशाबाबत कुणी चकार शब्दही काढत नाही. हा मुथालिक यांचा त्रागा योग्य आहे. मोदी यांच्यावर त्या बाबत टीका होत आहे. त्या टीकेला मुथालिक यांनी उत्तर देणं योग्य नाही. त्याचं कारण ते भाजपचे प्रवक्ते नाहीत किंवा सरकारचा घटकही नाहीत. तरीही एकवेळ त्याचं समर्थन केलं, तरी कर्नाटकात प्रत्येकवेळी एखादा कुत्रा मेल्यावर मोदींनी त्यावर प्रति क्रिया द्यायची का,’ असा त्यांचा सवाल वाद ओढवून घेणारा आहे. आपल्या एखाद्या कार्यकर्त्याची चौकशी केली जात असेल, तर न्यायमार्गानं सुसंगत उत्तर देता येतं; परंतु सुसंगता ठावूक नसणार्‍याकडून तशी अपेक्षा धर ता येत नाही. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास समितीनं विजयपुरा जिल्ह्यातील श्रीराम सेनेचा क ार्यकर्ता राकेश मठ याची चौकशी केली होती. त्यानंतर श्रीराम सेना पोलिसांच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ क ाढला जात असल्याचं मुथालिक यांनी आता म्हटलं आहे. परंतु, त्याला काहीही अर्थ नाही. मुथालिक यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्यानं त्यांना शहाणपण आलं आहे. लंकेश यांच्या मारेकर्‍यासाठी श्रीराम सेनेनं फेसबुकवरून आर्थिक मदतीचं आव्हान केलं होतं. त्यानंतर मुथालिक यांनी हे विधान केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. लंकेश यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा उल्लेख करत मुथा लिक यांनी काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे. काँग्रेसला आरोपीच्या पिंजर्‍यात जरूर उभं कर; परंतु आरोपीच्या समर्थनार्थ निधी जमा करून त्यांना निर्दोष सिद्ध करण्याच्या कृतीचा अर्थ कसा लावायचा, हे श्रीराम सेनेनं आणि मुथालिक यांनीही स्पष्ट करायला हवं.
काँग्रेसची सत्ता असताना कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या. त्या वेळी कोणीही काँग्रेसच्या नाकर्तेपणावर प्रश्‍नचिन्हं उपस्थित केलं नाही. आता मात्र लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का आहेत? असा सवाल विचारला जात आहे. लंकेश यांची तुलना कुत्र्यासोबत केल्यानं मुथालिक वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. मुथालिक यांनी विचारला. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार नेटकर्‍यांनी तर घेतलाच पण काँग्रेसनंही हे वक्तव्य घृणास्पद असल्याचं म्हटलं आहे. मुथालिक हे श्रीराम सेना या हिंदुत्त्ववादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. वयाच्या 13 व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या शाखेत जात होते. 1996 मध्ये संघातील वरिष्ठांनी मुथालिक यांना बजरंग दलात सहभागी होण्यास सांगितलं. बजरंग दलाचे दक्षिण भारत संयोजक पद मिळवण्यासाठी मुथालिक यांना वर्षभरापेक्षाही कमी कालावधी लागला. जहाल भाषा, आक्रमकता यासाठी मुथालिक ओळखले जातात. मागील 23 वर्षात प्रक्षोभक वक्तव्यं केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. एवढंच नाही, तर त्यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगातही जावं लागलं. मात्र अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं करू न त्यांना त्याचा राजकीय फायदा मिळाला नाही. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून फारकत घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्त्ववाद पुढं करून हिंदूंची फसवणूक करतो आहे, असा आरोप त्यांनी केला. 2007 मध्ये त्यांनी श्रीराम सेना स्थापन केली. हिंसा हाच या संघटनेचा मार्ग आहे असंही त्यांनी जाहीर केलं. 2008 मध्ये मुथालिक यांनी राष्ट्रीय हिंदुत्त्व सेनेचीही स्थापना केली; मात्र हा पक्ष निवडणूक लढवूनही आपलं अस्तित्त्व सिद्ध करू शकला नाही. आम्हाला यशस्वी होण्यासाठी पैसे, धर्म आणि टगेगिरी करणार्‍यांची गरज आहे असं विधान त्यांनी कॅमेरासमोर केलं होतं. चित्रकार एम. एफ हुसैन यांच्या कथित वादग्रस्त चित्रांवर हल्ला चढवणारी संघटनाही श्रीराम सेनाच होती. मुथालिक यांनी गौरी लंकेश यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत घृणास्पद आहे. यावरही पंतप्रधान गप्पच बसणार आहेत का, असा प्रश्‍न काँग्रेसनं विचारला आहे. मुथालिक यांचं वक्तव्य पंतप्रधानांना मान्य आहे असं समजायचं का? अशी विचारणा राहुल गांधी व मनीष तिवारी यांनी केली आहे. म्हैसूरच्या कायथामारेनहल्ली येथे दिलेल्या वादग्रस्त भाषणामुळं मुथालिक यांना दोन वेळा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भाषणानंतर हिंसा भडकली होती. त्यात चार जण ठार झाले होते. लंकेश यांची हत्या मागील वर्षी 5 सप्टेंबरला करण्यत आली. याप्रकरणी विशेष तपास पथक तपास करत होते. त्यांनी परशुराम वाघमारेला याप्रकरणी अटक केली असून धर्म रक्षणासाठी मी गौरी लंकेश यांची हत्या केली अशी कबुली त्यानं दिली आ
हे. या सगळ्या प्रकरणावरून पडसाद उमटत आहेत. अशात मुथालिक यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.