महापालिका शाळांसाठी शैक्षणिक धोरण तयार करू - बाबू नायर
पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, त्यातून अधिक फलनिष्पती होताना दिसून येत नाही. पालिका शाळेसाठी क ोणत्याही प्रकारचे शैक्षणिक धोरण नाही. यामुळे खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. यासाठी महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक व भाजपचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी महापालिकेकडे केली आहे. या धोरणाअंतर्गत शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होईल. पालिका शाळेतील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल होतील, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.
नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत 136 प्राथमिक व 18 माध्यमिक शाळा मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका शाळेच्या इमारीत सुसज्ज आहेत. शिक्षण विभागावर पालिका दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. परंतु, पालिकेचे शैक्षणिक धोरण नाही. नाविन्यपूर्ण शिक्षण दिले जात नाही.