Breaking News

मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्येकर्ते व संघटना प्रमुखांची बैठक संपन्न


पुणे - पुणे शहर जिल्हा मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्येकर्ते व संघटनां प्रमुखांची बैठक संपन्न झाली . क्वीन्स गार्डनमधील नवीन विश्राम गृहात झालेल्या या बैठकीमध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त व मातंग समाजाच्या आरक्षण अ,ब,क,ड विषयी चर्चा झाली. यावेळी उपरोक्त विषयावर 24 प्रमुख पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी दिलीप कांबळे यांनी आपल्या भाषणात मातंग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करीत आहे. मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहेत. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रभर फिरून समाजातील लोकांच्या सूचना घेणार आहोत, अण्णाभाऊंचे विचार व साहित्य सर्व सामान्यांपर्यंत पोहोचणार, शताब्दीवर्षात संबंध महाष्ट्रात कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम हा रशियामधील मॉस्को शहरात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान यांना आमंत्रित करणार आहे. तसेच समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराच्यासंदर्भात भूमिका मांडली व जातीचे दाखले मिळण्यासंबंधी सुलभता व शासकीय योजनांची ही माहिती दिली.