Breaking News

लंके प्रतिष्ठानतर्फे इफ्तार पार्टी


सुपा  प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील हंगा येथे निलेश लंके प्रतिष्ठानवतीने शुक्रवारी { दि. १५} इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे रमजान महिना. या काळामध्ये बहुतेक मुस्लिम बांधव रोजा धरतात. एक महिन्याच्या उपवासावर थोडी शितलता यावी व मुस्लिम बांधवांना या रोजाच्या महिन्यात थोडासा दिलासा मिळावा, यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असते.

इफ्तार पार्टीप्रसंगी पारनेर-नगर तालुक्याचे लोकनेते निलेश लंके उपस्थित होते. त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ढवळे, सरपंच माजी राजेंद्र शिंदे, उपसरपंच सतीश दळवी, राळेगण थेरपाळचे ह.भ.प.गाडीलकर महाराज, चेअरमन तुकाराम नवले, माजी सरपंच प्रकाश दळवी, राजू शेख, रियाज शेख, फकीर शेख, हमीद शेख, जैनुउद्दीन बेग आदींसह बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.