Breaking News

पांगुळ गाड्याने त्याला मिळाली नवजीवन जगण्याची उमेद


कुकाणाः- (प्रतिनिधी ) 
वयाच्या नवव्या वर्षीच नशिबी अपंगत्व आलेल्या युवकाला कुकाण्यातील मुस्लिम युवकाने पवित्र अशा रमजान ईद सणानिमित्ताने पांगुळगाडा देऊन बंधुत्वाची भावना जोपासत त्याला नवजीवन जगण्याची उमेद दिली. नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील अठरा वर्षाचा युवक राहुल शिवाजी भोसले हा भानसहिवरा( ता.नेवासा ) येथील गाडगेबाबा आश्रम शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असताना त्याला चिकणगुण्या सदृष आजार झाला व त्यावेळी पैशाअभावी व योग्य उपचार न मिळाल्याने त्याला कायमस्वरूपीचे अपंगत्व पत्कारावे लागले. या आजारामुळे त्याचे हात आणि पाय निकामी झाले,आपला कोणाला भार होऊ नये म्हणून त्यांने अपंगत्वावर मात करत तो भिक मागुन पोटाची खळगी भरावी लागला. राहुल हा भीक मागण्यासाठी कुकाणा येथील गुरुवारच्या आठवडे बाजारातही आला. यावेळी नाभिक समाजातील समाजसेवक संजय वाघ, अशोक पंडित व किशोर पंडित यांची भेट झाली .तेंव्हा वाघ यांनी चौकशी करून त्याची मोफत वाढलेली कटींग-दाढी केली व नवीन कपडे देऊन त्यास स्वच्छ केले. यावेळी तेथे तोसिफ असलम शेख (रा. कुकाणा) हा युवक आला असता राहुल चे अपंगत्व पाहून त्याच्या मधील माणुसकी जागृत होऊन आपण यासाठी काय करु शकतो हा प्रश्‍न मनामध्ये निर्माण झाला. आणि पवित्र अशा रमजान ईद या सणाचे औचित्य साधून तोसिफ याने 750 रुपये खर्च करून एक पांगुळगाडा तयार करून घेतला.व राहुल भोसले या अपंग युवकाला बोलावून घेऊन रमजान ईद या सणाच्या दिवशी त्याला भेट दिला. तसेच यावेळी मौलाना इम्रान सहाब, हनिफभाई शहा यांनी देखील राहुल यास दोनशे पन्नास रुपये देऊन विशेष सहकार्य केले. यावेळी पोपट सरोदे समाजसेवक संजय वाघ, अशोक पंडित, किशोर पंडित, शिवनाथ थोरे, पठाण वायरमन, रुबाब शहा, शाहरुख शहा, समीर पठाण, मुसाभाई इनामदार, जय किसान दुध संकलन केंद्राचे संचालक अरुण फोलाणे, समीर शहा, प्रमोद काटे उपस्थित होते.