Breaking News

डाक सेवकांना भरघोस पगारवाढ मंजूर

ग्रामीण डाकसेवकांच्या सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामीण डाकसेवकांना याचा लाभ होईल. यामुळे चालू आर्थिक वर्षात १,२५७ कोटींचा बोजा पडेल. यापैकी ८६० कोटी थकबाकी वगैरेसाठी एकदाच खर्च करावे लागतील तर आणखी ३६० कोटींचा दरवर्षी वाढीव खर्च होईल.

पगाराची फेरचना करताना आता ग्रामीण डाक सेवकांची ‘ब्रँच पोस्ट मास्टर’ व ‘असिन्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसह इतर’ अशी वर्गवारी केली गेली आहे. जे ब्रँच पोस्ट मास्टर दिवसाला किमान चार तास काम करतात, त्यांना १२ हजार तर दिवसाला पाच तास काम करणा-यास १४,५०० रुपये इतका पगार (टाइम रिलेटेड कन्टिन्युइटी अलाऊंस-टीआरसीए) मिळेल. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर व अन्य डाकसेवकांसाठी ही वेतनश्रेणी अनुक्रमे १० हजार व १२ हजार रुपये असेल. तसेच यांना महागाई भत्ता स्वतंत्रपणे मिळेल. अ