आदिवासी आश्रमशाळेत योगदिन उत्साहात
संगमनेर : जयहिंद आदिवासी आश्रमशाळा, कोळवाडे येथे योगदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी दिली. संगमनेर पंचायत समितीचे सदस्य काशिनाथ गोंधे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भाऊसाहेब नवले, उपसरपंच मंगेश वर्पे, पर्यवेक्षिका श्रीमती कोल्हे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अंत्रे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी आणि कोळवाडे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
