Breaking News

धरणासाठी योगदान देण्याचे भाग्यच समजावे लागेल : देशमुख


कोतुळ / प्रतिनिधी  
आपल्या गावच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य समजतो. आपण जेंव्हा पाटबंधारे विभागात पदावर कार्यरत होतो, तेंव्हा पिंपळगाव खांड धरणाची मागणी जोर धरून होती. त्या वेळचे मंत्री आणि तालुक्यातील आमदारांनी आणि जनतेने ही मागणी केली होती. अनेक अडचणी आणि परवानग्यांची आवश्यकता होती. मात्र ईच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर हे धरण आज पुर्ण झाल्याचा आनंद आहे.
असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे महसुल विभागाचे उपसचिव अजित देशमुख यांनी लोकमंथनशी बोलताना केले. काल ते पिंपळगाव खांड धरणावर आले होते. पिंपळगाव खांड धरणाचे बांधकाम कोलग्राऊंट मशनरी पध्दतिने केले आहे. नदिपात्रात ओव्हरफ्लो असणारे धरण असुन या धरणाच्या भिंतिची लांबी 189 मिटर आहे. नदिपात्रात भिंतीची उत्सरी भागाची ऊंची 25 मी. आहे. अनुत्सरी भागाची 31 मी. ऊंची आहे. धरणासाठी 550 क्युसेक महत्तम विसर्ग क्षमतेचे 1.2 मी. बाय 1.2 मी. साईज असलेले सिंचन विमोचक गेट आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र तब्बल 320 चौरस कि.मी. आहे. प्रकल्पात 163 हेक्टर क्षेत्र बुडित झाले असुन, धरणामुळे 1778 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.


संगमनेर, अकोले तालुक्यातील 22 गावांना पाणी योजनेसाठी तसेच मुळानदी पात्रातील पिंपळगावखांड, लहित, वाघापुर, पिंपळदरी, चास, कौठे, घारगाव, बोरबन, नांदुर, खांदरमाळ, आभाळवाडी अशा 14 को. प. बंधार्‍यांना या धरणाचा फायदा होणार आहे. योगाने पिंपळगाव खांड धरणाच्या मागणीवेळी पाटबंधारे विभागात अधिकार पदावर होतो. कायमच दुष्काळी भाग म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मुळा विभागाला पिंपळगाव खांड धरणामुळे संजीवनी मिळाली. स्थानिक आमदारांनी त्या काळी केलेले प्रयत्न आणि वेळो वेळी केलेला पाठपुरावा धरणाच्या निर्मितीला आणि पुर्णत्वाला महत्वपुर्ण ठरल्याचे अजित देशमुख यांनी सांगितले. आपले आधिकार आणि कर्तव्य यांची जाण ठेवुन काम केल्यास लोकोपयोगी योजना निश्‍चितच चांगल्या प्रकारे साकार होऊन गावचा विकास होऊ शकतो असे अजित देशमुख यांनी सांगितले.