आयपीएल सामन्यादरम्यान सट्टा लावल्याची अरबाज खानची कबुली
ठाणे - आयपीएल सट्टा प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता-निर्माता असलेल्या अरबाज खानला समन्स पाठवले होते. त्यानुसार आज (2 जून) अरबाज ठाणे पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने चौकशीदरम्यान आपण आयपीएल सामन्यादरम्यान सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. देशात चालणार्या सट्टा बाजारातील सर्वात मोठा नामचीन बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू जालान उर्फ सोनू मालाड याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यामुळे सट्टा बाजारात दाऊद इब्राहिम याचा सहभाग असल्याचे उघड झाले. या संदर्भात सोनू जालान याने चित्रपट अभिनेता-निर्माता अरबाज खान याचे नाव घेतल्याने ठाणे पोलिसांनी अरबाजला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार चौकशीनंतर अरबाजला सोडून देण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सौनू जालान याच्यासोबतच अरबाज खानची चौकशी क रण्यात आली.
