Breaking News

उतराखंडच्या 4 जिल्ह्यात ढगफुटी पुढील 24 तासात सतर्कतेचा इशारा

देहरादून : उत्तराखंडमध्ये मान्सून पोहचायला अजून वेळ असला तरी तेथे वातावरण अतिशय खराब झाला आहे. उत्तराखंडमधील चार जिलह्यांमध्ये ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधल्या टिहरी, उत्तरकाशी,पौडी आणि नैनीताल जिह्यांमध्ये ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये मुसळधार पाऊस झाला. ढगफुटीमुळे तेथील स्थानिक नद्या व नाले दधडी भरून वाहू लागले तसेच तेथील घरांमध्येही पाणी शिरले आहे.पादचारी मार्ग वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळे बद्रीनाथ हायवेही आठ तास बंद ठेवण्यात आला. वातावरणाती बिघाड लक्षात घेता सरकारने सर्व जिल्हाधिकाऱयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह पोलिसांनाही हायअलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील बिघडलेलं वातावरण लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य हवामान केंद्राचे निर्देशक विक्रम सिंह यांच्या माहितीनुसार, देहरादून, उधमसिंहनगर, हरिद्वार आणि पौडी गढवालमध्ये 70 ते 80 किलोमीटर प्रतीतास या वेगाने वारे वाहतील. उत्तराखंडाच्या डोंगराळ भागात तुफान पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविली आहे.