Breaking News

भूमातेचे आरोग्य जपले तरच आपले आरोग्य अबादीत : डॉ. दुरगुडे


अकोले / प्रतिनिधी  
भूमाता मानवालाच नव्हे तर, 95 टक्के जीवांना अन्न पुरविण्याचे महान काम करते, मात्र जमिनीचे आरोग्य आपण रासायनिक खते व औषधे वापरून खराब केले आहे. तिच्यापासून मिळणारे अन्नधान्य घातक तयार होऊन, आज जीवांचे आरोग्य धोकादायक बणले आहे. तेंव्हा वेळीच जागे होऊन, प्रथम भूमातेचे आरोग्य जपले तरच, जमीन आपले आरोग्य अबादीत ठेवील. आरोग्यवर्धक शेती करण्यासाठी, जशी पंढरीच्या पांडुरंगाची वारी करता तशी, कृषि विद्यापीठाची वारी सदैव करण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृद्शास्रज्ञ डॉ. अनील दुरगुडे यांनी, अकोले येथील जमीन सुपीकता व खत साक्षरता मार्गदर्शन शिबिरात शेतकर्‍यांना केले. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा आत्मा संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे होते. 
व्यासपीठावर डॉ. दशरथ बंगाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषि मंडळ अधिकारी विठ्ठल बांबळे, आत्मा तंत्रज्ञ बाळनाथ सोनवणे, सेंद्रिय गट अध्यक्ष संपत वाकचौरे, सचिव बबन शेटे, अगस्ती साखर कारखाण्याचे माजी संचालक भाऊ खरात, आत्मा संचालक सुभाष वाकचौरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अकोले तालुका कृषि विभाग व अगस्ती परिसर सेंद्रिय शेती माल उत्पादक गट अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. 
डॉ. दुरगुडे पुढे म्हणाले की, जमिनीची सुपिकता वाढविण्याकामी जीवाणूंचे काम महत्त्वपूर्ण आहे. एक ग्राम वजणाच्या मातीत कोट्यावधी जीवांणू असतात. ते खतांचे रुपांत्तर अन्नरसात करुन पिकांना अन्न पुरवितात. पिक डायरेक्ट खत खात नाही. तेंव्हा जीवांणू संपले तर, खते निरुपयोगी ठरतात. रासायनिक खते व विषारी किटक नाशके जीवांणू मारण्याचेच काम करतात परिणामी भूमाता मृत ह़ोऊन, पिक उत्पन्न घटते आणि खर्च वाढला आहे. भूमातेची सुपिकता नष्ट करुन, आपणच नाना आजार वोढवून घेतले आहेत. या समश्येची जाणीव जानकारांना झाल्यामुळे सेंदिय शेती चळवळ उभी राहिली आहे. आपण याचा वेळीच विचार करुन शास्रीय पद्धतीने शेती करा तरच तराल इशारा दिला. 
या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक अशोक धुमाळ, बी. एन. वाकचौरे, कृषि सहाय्यक स्वप्नील बुळे, शेतकरी मित्र विकास आरोटे, सुनील वाकचौरे, रोहिदास ढगे, बाळू वाजे, गंगाराम धिदंळे, शेतकरी सखाराम पोखरकर, रामनाथ आवारी, दत्तू वाकचौरे, रामलाल हासे, बाळासाहेब देशमुख, पुंजीराम वाकचौरे, भागवत वाकचौरे, बादशाह नवले, छाया कोटकर, महेश वाकचौरे, शिवाजी आवारी, भरत बंगाळ, धोंडीबा वाकचौरे यांसह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक संपत वाकचौरे यांनी, तर सूत्रसंचालन बाळनाथ सोनवणे यांनी केले. शेवटी आभार भाऊ खरात यांनी माणले.