महावितरणाच्या गलथान कारभारावर महाबळेश्वरकर संतप्त
सातारा - उन्हाळी हंगामासारखीच पावसाळी हंगामामध्ये झाली असून महाबळेश्वर व तालुक्यात वीज मंडळाच्या गलथान कारभाराला तालुक्यातील ग्राहक वैतागले आहेत एन हंगामात ’’वीज’’ नसल्याने पाणी पुरवठा व व्यवसायावर परिणाम झाला होता पर्यटकांची देखील गैरसोय झाली होती आता पावसाळ्याच्या प्रारंभी देखील जैसे थे परिस्थिती असल्याने महावितरणच्या या अनागोंदी कारभारावर महाबळेश्वरकर संताप व्यक्त करीत आहेत . पावसाळ्याच्या सुरुवातीला व ऐन सुट्टीच्या हंगामात व पर्यटकांनी गजबजलेल्या महाबळेश्वरमध्ये महावितरणच्या भोंगळ क ारभारामुळे पर्यटक,स्थानिक नागरीक,व्यापारी देखील त्रस्त झाले.त्यातच रमजानच्या पवित्र महिन्यात येथील बांधवांचे रोजे सुरु असताना मात्र लाईटचा रोजचाच लपंडाव सुरू होता व महा वितरणच्या कार्यालयात फोन केला तर फोन उचलायला देखील माणूस नाही अशी परिस्थिती . वेण्णा लेक मधुन महाबळेश्वर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 270 हि मोटारी आहेत , पण ह्या मोटारी सुरू करण्यासाठी 33 के.वी. लाईट करंट असल्याशिवाय या मोटारी सुरू होत नाहीत . पण परिस्थिती अशी घरात लाईट आहे पण, पाणी मात्र नाही व स्थानिक नागरीक पाणी पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून 4 ,5 दिवस खुप त्रस्त झाले महावितरणच्या गलथान कारभाराने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे महावितरणची असाच कारभार राहिला तर स्थानिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल.त्यामुळे महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा कारण्याची मागणी होत आहे. सतत खंडित होणार्या वीजपुरवठ्याबाबत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येथे असलेल्या अधिकार्यांना अपयश आले असून विनाव्यतय वीजपुरवठा सुरु व्हावा यासाठी प्रयत्नच होताना दिसत नसून शहरासह ग्रामीण भागातुन वीज वितरांबाबत नाराजीसह गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
