भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शेवगाव तहसीलदारांना निवेदन
शेवगाव प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक 20 जून रोजी राज्यभर तहसीलदार व शासकीय कार्यालयांवर निदर्शने करण्यात येत आहेत. देशातील पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशभर निदर्शने करण्यात आली . त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव तहसीलदार दीपक पाटील यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
देशभरात अच्छे दिनाच्या नावाने सरकारने केलेल्या घोषणा फोल ठरत आहेत. याउलट महागाईचा कहर होत आहे.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. त्यातच मागील वर्षी कपाशी सारख्या पिकाने शेतकर्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आणून ठेवली आहे. अशातच सरकारने सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभे न राहता सामान्य जनतेची हेळसांड केली आहे. एकीकडे ’अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून दुसरीकडे होत असलेल्या त्रासाला जनता वैतागली आहे. यामुळे पक्षाच्या वतीने जाहीर निदर्शने करून होत असलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सुभाष लांडे, शशिकांत कुलकर्णी , संजय नांगरे , भगवान गायकवाड, शिवाजीराव देवढे, बापूराव राशिनकर, अविनाश गायकवाड, अशोक नजन, आसाराम उगले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, शेवगाव स्वाभिमानी शहर अध्यक्ष दत्ता फुंदे, गोरक्षनाथ शेलार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
