सेल्फी घेताना विवाहितेचा दरीत कोसळून मृत्यू
रायगड : सेल्फी घेण्याच्या नादात सुरक्षिततेकडे केलेलं दुर्लक्ष कसं जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. माथेरानमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून 35 वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले. दिल्लीत राहणार्या 35 वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या. लुईसा पॉईंटवर सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सरिता आणि त्यांचा पती सेल्फी काढण्यासाठी गेले होते. याचवेळी आलेल्या जोराच्या वार्यामुळे सरिता यांचा तोल गेला आणि त्या दरीत कोसळल्या.
