Breaking News

ईदमिलन राष्ट्रीय ऐक्य वाढविणारा उपक्रम - पाटील


नेवासा (प्रतिनिधी) 
नेवासा येथील काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष मौलाना जाकीरभाई शेख यांच्या वतीने आयोजित ईदमिलन कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ईद मिलन कार्यक्रमातून जातीय सलोखा वृद्धिंगत होतो. हा उपक्रम राष्ट्रीय ऐक्य वाढविणारा असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या ईदमिलन कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाचे संयोजक सलीमभाई पेंटर, जावेद शेख, मौलाना जाकिरभाई शेख, जाहिल पप्पीभाई शेख यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक गफूरभाई बागवान, बाळासाहेब पाटील, कृष्णा डहाळे, नगरसेवक लक्ष्मणराव जगताप, नगरसेवक दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे, राजेंद्र मापारी, सचिन वडागळे, अंबादास ईरले, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ, मुन्नाभाई शेख, विनोद कराडे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भदगले, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे, अँड.आण्णासाहेब अंबाडे, बद्रीनाथ चिंधे, ललित मोटे, महेश मापारी, विनायक नळकांडे, नितीन खंडागळे, अभयकुमार गुगळे, प्रकाश सोनटक्के, रवि काळे, नितीन मिरपगार, गंगाराम कणगरे, पंकज जेधे, कमलेश जगताप, निलेश जगताप, कमलेश ईरले, अँड. कदम, पोलीस स्टेशनचे सुहास गायकवाड, राहुल यादव, निखिल चंदानी,सचिन बनसोडे,व्यापारी कैलास कुंभकर्ण,अँड.जावेद इनामदार,सुलेमान मणियार,असिफभाई पठाण, अब्बासभाई बागवान, युसूफभाई शेख, ओंकार जगताप यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.