जामखेड आगारातील नऊ निवृत्त कर्मचारर्यांना निरोप
जामखेड : येथील एसटी आगारतील नऊ एसटी कर्मचारर्यांना निरोप देण्यात आला. तीन दशकाहुन अधिक काळ त्यांनी सेवा केली. जामखेड आगारकडुन त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
जामखेड आगारात झालेल्या या छोट्याखानी सत्कारासाठी आगारप्रमुख महादेव शिरसाट, राजेंद्र गायकवाड, भास्कर घुले, नितीन दाणी, नवीन सोनार, शांतीलाल रासकर, अजित कोल्हे, हनुमंत देशमुख, बाबासाहेब चितळे, अरुण गरड, जाकीर शेख, संपत गर्जे, हनुमान आंधळे यावेळी उपस्थित होते.
38 वर्षांच्या प्रदीर्घ उत्तम सेवेनंतर निवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक सुनिल साळुंके, एस.व्ही कानडे, टी.ए. भांडवलकर, डी.आर. गायकवाड, वाय.एफ जहागीरदार, जे.बी. खाडे, एस.बी जाधव (सर्व चालक) डी.ए घागरे व हरिभाऊ कोठावळे (वाहक) यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रवाशांच्या सेवेसाठी अशी ब्रीदवाक्य घेऊन आम्ही प्रामाणिकपणाने गेली 37 वर्ष प्रवाशांची सेवा केली, आता खूप जड अंतःकरणाने निरोप घेताना वाईट वाटत आहे. एस.टी ही आमच्या जीवनाचा भाग होऊन बसली आहे. ती आता सोडताना वाईट वाटत आहे. अशा शब्दांमध्ये निरोप दिला. यावेळी गणेश मासाळ यांनी सुत्रसंचालन केले, तर देशमुख यांनी आभार मानले.
