Breaking News

अहेरी-हैदराबाद वातानुकूलित शिवशाही बसचा शुभारंभ

पुर्णपणे वातानुकूलित अहेरी-हैदराबाद या शिवशाही बस सेवेचा आज अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवून भव्य शुभारंभ केला.

महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरात या शिवशाही बसेस दाखल झाल्या होत्या. परंतु अहेरी आगारात या बसेस न आल्याने अनेक लोकं याची वाट पाहत होते. याची दखल घेत पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी या शिवशाही बस सेवा गडचिरोली जिल्ह्यात लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी एक पत्र देऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते ह्यांच्या कडे केली होती. त्याची दखल घेत परिवहन मंत्रांनी जिल्ह्यातील गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगारात प्रत शिवशाही बसेस उपलब्ध करून दिले व आज त्या सेवेचा शुभारंभ झाला.
दररोज सायंकाळी 7 वा. ही वातानुकूलित शिवशाही बस अहेरी येतून निघून वाया चंद्रपूर मार्गे दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वा. हैदराबाद ला पोहचेल. या मार्गासाठी एकूण भाडे हे 843 रु.आहे. ह्या बस सेवेमुळे व्यापारी, विद्यार्थी,पर्यटक तसेच नातलगांना मोठी सवलत झाली आहे यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.