शनि शिंगणापूर देवस्थानचा कारभार राज्य सरकारच्या ताब्यात
राज्यसरकार नेमणार प्रशासक ; 1963 पासून असलेली अध्यक्ष निवडीची पंरपरा मोडीत
अहमदनगर : कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि शिर्डीतील साई देवस्थानच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाचा कारभारही राज्य सरकारच्या ताब्यात येणार आहे. त्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आला असल्याची माहिती बुधवारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तम सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार असल्याचेही बैठकित जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे शनैश्वर देवस्थानच्या कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरक ारकडून होणार आहे. 1963 सालापासून शिंगणापूरची अध्यक्ष निवडीची परंपरा मोडित निघणार आहे. देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेने ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारने समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राजकीय महत्वकांक्षेतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
सध्या शनी शिंगणापूर देवस्थानावर नेवासा तालुक्यातील बडया राजकीय नेत्यांचे व्यक्तींचे प्राबल्य आहे. त्यांच्या निकटवर्तीयांचीच येथे अध्यक्ष, ट्रस्टीपदी वर्णी लागत होती. काही दिवसांपूर्वी शनी चौथर्यावर महिला प्रवेशासाठी देवस्थान संपूर्ण देशात चर्चेला आले. त्यानंतर ट्रस्टची मुदत संपल्याने नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. शनि शिंगणापूर ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष झाली आहे. जो सदस्य शनि शिंगणापूर गावातील नागरिक आहे, तोच ट्रस्टच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतो. त्यामुळे सर्वच सभासद बॉडी निवडण्यामागे येथील राजकीय नेत्यांच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका ठरत होती. अखेर या संपूर्ण प्रक्रियेला छेद देत, शनि शिंगणापूर देवस्थानचा कारभार राज्य सरकारने आपल्याकडे घेऊन, लवकरच येथे प्रशासक नेमण्याच्या हालचाली तीव्र केल्या आहेत.
चौकट...
शनी शिंगणापूर देवस्थानकडे आजमितीस 72 एकर जमीन असून, यापैकी मंदिरासह परिसर सात एकरावर विस्तारलेला आहे. तर इतर शेत जमीन आहे. श्री शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह 11 विश्वस्त असून, सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळात अध्यक्षासह दोन महिला आणि नऊ पुरुष आहे. अनिता शेटे या देवस्थानच्या विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नानासाहेब बानकर आहेत.